Breaking news : ब्रह्मपुरीत 34 गोवंशांची अवैध वाहतूक उघड; आयशर वाहनासह चालकास अटक, दोन आरोपी फरार... स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.....
कारवाईत वाहन चालक सरगम गुलाबसिंह धुर्वे (33 वर्ष, रा. शिवनी, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे दोन साथीदार वाहन थांबविण्याच्या वेळी पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत चालकाने हे जनावरे पाहिजे आरोपी तौसिफ खान, रा. नागपूर याचे असल्याची माहिती दिली.
जप्त केलेल्या सर्व गोवंशांना ताब्यात घेऊन त्यांची सुरक्षिततेकरिता गोरक्षण संस्था, लाखनी (भंडारा) येथे सुपूर्द करण्यात आले. चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपीविरुद्ध गु. क्र. 647/25, कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960, तसेच 5(अ), 5(ब), 9 महाराष्ट्र प्राणीसंवर्धन अधिनियम, आणि 3(5), 49 BNS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जप्त मालामध्ये:
34 गोवंश (गाई व बैल) किंमत – ₹8,50,000
आयशर वाहन – ₹25,00,000
मोबाईल फोन – ₹15,000
असा एकूण ₹33,65,000 किमतीचा माल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सुदर्शन मूम्मक्का, मा. अप्पर पोलीस अधीक्षक कातखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नी. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात संतोष निंभोरकर, पोउपनी; नितेश महात्मे, गणेश भोयर, पोअं अजित शेंडे, गजानन मडावी आणि स्थानीय गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने केली.
