Top News

काम न झाल्यास गावकरी मतदानावर बहिष्कार घालणार! आम सभेत ठराव पारीत

काम न झाल्यास गावकरी मतदानावर बहिष्कार घालणार! आम सभेत ठराव पारीत


भाजप सरपंचाच्या गावात रस्त्याविरोधात असंतोष – निवडणुकांवर बहिष्कार 



गडचांदूर : गडचांदूर – पिंपळगाव: गडचांदूर–पिंपळगाव–नांदा रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे पिंपळगाव गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत “रस्ता नाही तर मतदान नाही” असा ठराव पारित करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते रमेश लोणबले यांनी सांगितले की, सरपंच व सचिवांनी गावकऱ्यांना समजावून आंदोलन करण्याऐवजी ठराव पारित करण्याऐवजी रस्ता तातडीने होईल यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा होती. शासनाने या रस्त्यासाठी 70 लाख रुपये निधी मंजूर केला असून त्याचे टेंडरही निघाले आहेत. तसेच ऑगस्ट 2025 मध्ये 25 लाख रुपयांचा टेंडर काढण्यात आला होता, मात्र चार महिने उलटूनही वर्क ऑर्डर ठेकेदाराला देण्यात आलेली नाही.


लोणबले म्हणाले, “आम्ही वेळोवेळी लोकप्रतिनिधींना निवेदन देत आहोत. जवळपास 95 लाख रुपये या रस्त्यासाठी मंजूर आहेत. काम तात्काळ सुरू झाले असते, तर आज गावकऱ्यांना निवडणुकीवर बहिष्कार ठरवण्याची वेळ आली नसती.”


विशेष म्हणजे, पिंपळगावमध्ये भाजपचा सरपंच असूनही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार ठराव पारित झाला आहे. प्रशासनाने गावकऱ्यांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे लोणबले यांनी म्हटले आहे.


पूर्वीही पालगाव रस्त्यासाठी अल्ट्राटेक कंपनीविरोधात चक्काजाम आंदोलन झाले होते. तसेच बाखर्डी–नोकरी 2.5 किलोमीटर रस्ता दुरुस्तीकरिता 7.5 कोटी रुपये मंजूर केले असून काम सुरू झाले आहे. मात्र, गडचांदूर–पिंपळगाव–नांदा रस्त्यासाठी पुरेसा निधी देण्यात आलेला नाही, ज्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.

Previous Post Next Post