संभाजी ब्रिगेड चा प्रभाग क्रमांक तीन मध्ये दणदणीत विजय
बल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस संभाजी ब्रिगेड बल्लारपूर विकास आघाडी यांची युती होती याच संभाजी ब्रिगेडने प्रथमच नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक तीन मधून शिल्पा चुटे या 351 मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. प्रभाग क्रमांक तीन मधून फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रभागातील लोकांनी भरघोस आशीर्वाद देऊन विजयी केलेला आहे. या विजयाकरिता संभाजी ब्रिगेडच्या शाखाप्रमुख सुभाष पोटे रोहित चुटे. प्रतीक वाटेकर संकेत चौधरी, गणेश मसराम प्रज्वल गौरकार पवन राजगडे , कुणाल क्षीरसागर, अमीर अहमद, नितीन कृष्णा पल्ली, निखिल वडस्कर, कुणाल पटले,अंकुश पिंपळकर,प्रणय कष्टी, निलेश सुर,मयूर पोळे यांनी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष साहिल घीवे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी हा गड लढवला व जिंकला तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील लोकांनी सच्चा फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रभाग क्रमांक तीन हा बहुजन विचारांचा गड आहे हे सिद्ध करून दाखवले. येणारे पुढील पाच वर्ष प्रभागाच्या विकासासाठी व फुले शाहू आंबेडकर चळवळीला पुढे नेण्याकरिता काम करणार आहे असे नवनिर्वाचित संभाजी ब्रिगेडच्या नगरसेविका शिल्पा चुटे यांनी सांगितले आहे.
