पो.स्टे. मुल हद्दीत गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
चंद्रपूर : पोलीस स्टेशन मुल हद्दीत गोवंशांची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून 14 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई दि. 17 डिसेंबर 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुल पोलीस स्टेशन हद्दीतील बाबराडा बेघर वस्ती परिसरात पिकअप वाहन क्रमांक MH-40-CT-4197 वर छापा टाकला. यावेळी वाहन चालक शेख रमजान शेख चांद (वय 22) व नितेश शामराव राउत (वय 25) यांना ताब्यात घेण्यात आले. छाप्यादरम्यान पिकअप वाहनात 5 गोवंश तर वाहनाखाली बांधलेले 9 गोवंश असे एकूण 14 गोवंश (बैल) आढळून आले. सदर गोवंशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्यार फाउंडेशन, छोटा नागपूर, जि. चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन मुल येथे गुन्हा क्रमांक 608/2025 नोंद करण्यात आला असून भा.प्रा.क्रू.वा.प्र.अ. 1960 चे कलम 11(1)(घ)(ड)(च)(ज) सह म.प्रा.सं.अ. 1976 (सुधारित 2015) चे कलम 5(अ), 9, 11 तसेच बीएनएस 2023 चे कलम 3(5), 49 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पिकअप वाहन व 14 गोवंश असा अंदाजे 7 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींची नावे :
1. शेख रमजान शेख चांद, वय 22, रा. विठ्ठलवाडा, बस स्टॉप जवळ, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर.
2. नितेश शामराव राउत, वय 25, रा. घडोली, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर.
या प्रकरणातील तिसरा आरोपी अष्पाक कुरेशी, रा. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई उपविभाग मुल, ब्रम्हपुरी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

