Top News

मूल नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांचा शानदार विजय

 मूल नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांचा शानदार विजय


मूल नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांचा विजय




आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जोराचा झटका

भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा.किरण कापगते यांचा दारुण पराभव


मुल | संदीप तेलंग | : मूल नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चढल्याचे दिसले असतांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक दबाव सत्ताधारी भाजप आणि स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वाढल्याचे दिसले. ०२ डिसेंबर २०२५ रोजी मूल नगरपालिकेचे मतदान झाले होते. ०३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार होता मात्र न्यायालयाच्या निर्देशानुसार २१ डिसेंबर २०२५ निकाल जाहीर करण्यात आला.त्यामुळे मतदारांमध्ये निकालाची प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली होती.दावे प्रतिदावे काँग्रेस भाजप कडून करण्यात येत असतांना पैजा सुध्दा लावण्यात आल्याच्या चर्चा होत्या.निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते आणि त्याचे रूपांतर मतदानात होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.मूल शहरातील मतदारांची आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल व्यक्त होणारी नाराजी,भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा.किरण कापगते यांचा जनतेशी थेट नसलेला संबंध,स्थानिक जनतेशी नसणारा प्रा.किरण कापगते यांचा संपर्क,वाढते स्थानिक प्रश्न आणि भाजपच्या तिकीट निवडीतील गोंधळ या सर्वांचा परिणाम काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता समर्थ यांच्या बाजूने झुकताना निवडणुकीत दिसला. त्याचे प्रत्यय निकालात काँगेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांच्या विजयात झाल्याचे दिसते.तर भाजपची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची निवड चुकल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मोठ्या नामुष्कीला त्यांच्याच क्षेत्रात जावे लागत असल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची पुढील वाटचाल खडतर असल्याचे बोलले जात आहे.

आमदात सुधीर मुनगंटीवार यांनी बाहुला उमेदवार दिल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनाच प्रत्यक्षात कसरत करावी लागली आणि त्यामुळेच त्याचे पर्यवसान पराभवात झाल्याच्या जनतेत चर्चा असल्याचे दिसून आले.शांत स्वभाव, स्पष्ट व्हिजन आणि भक्कम जनसंपर्क काँग्रेसच्या उमेदवार एकता समर्थ यांच्या बाजूने होता.त्या शांत, संयमी स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात. गेल्या काही वर्षांत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे महिलांमध्ये, युवकात आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भक्कम विश्वास निर्माण केला होता.भाजपने तिकीट निवडीत अखेरच्या क्षणी केलेल्या उलटफेरीमुळे शहरात असंतोष निर्माण झाला होता. डमी उमेदवार, सर्वेक्षणाचा दावा आणि उमेदवारीत केलेला अचानक बदल या सर्वामुळे मतदारांमध्ये निर्माण झालेला गोंधळ निकालात दिसून आला. याचा थेट राजकीय फायदा काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांना मिळाला.

शहरातील तरुण मतदार, महिलांचा वाढता सहभाग आणि स्थानिक प्रश्नांना तातडीचे समाधान हवे असल्याची भावना यामुळे परिवर्तनाची हवा अधिक वेगाने वाहू लागली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरात केलेला प्रचार, एकता समर्थ यांची सकारात्मक प्रतिमा आणि स्थानिक पातळीवरील भाजपमध्ये असंतोष या मिश्र परिणामामुळे काँग्रेस ची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत होती.गेल्या अनेक वर्षापासून भाजपची एकहाती सत्ता असल्याने जनता कंटाळली होती. त्यामुळे जनतेला सुद्धा बदल हवा आहे असा जनमानसात मतप्रवाह सुरू होता. त्याचे पर्यवसान आज निकालातुन दिसून आले.काँगेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना जोराचा झटका देत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा.किरण कापगते यांचा पराभव करून विजय संपादन केला.मूल नगरपालिकेत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.एकता प्रशांत समर्थ या आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या बाहुल्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविल्यामुळे काँगेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Previous Post Next Post