बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूल तर्फे नगरसेवकांचे अभिनंदन
मुल | संदीप तेलंग उपजिल्हा प्रतिनिधी | मूल नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या बेलदार समाजातील नगरसेवक विलास कागदेलवार, विवेक मुत्यलवार आणि राहुल प्रेमलवार यांचे बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूल यांच्या वतीने घरी जाऊन अभिनंदन करण्यात आले.
विजयी नगरसेवकांना सदिच्छा भेट देत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी समाजाच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मूलचे अध्यक्ष संदीप कारमवार यांच्यासह सदस्य डॉ. सुभाष रेड्डीवार, अशोक मैदमवार, मारोतराव पुल्लावार, महेश गाजूलावर, सुरेश गुज्जनवार, संदीप आलेवार, सोमेश्वर रेड्डीवार, विवेक कामिडवार, संजय रेगुलवार, शैलेश देशट्टीवार, पंकज महाजनवार, मोरेश्वर बोप्पावार आदी समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी समाजकार्यासाठी तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
