Top News

ट्विंकल इंग्लिश स्कूलने विज्ञान उत्सव गाजवला..

 ट्विंकल इंग्लिश स्कूलने विज्ञान उत्सव गाजवला..


विद्यार्थी विज्ञान उत्सवात ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीडचा विज्ञान नाटिकेत प्रथम क्रमांक






नागभीड | विज्ञान भारती (VIBHA) व चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विज्ञान उत्सव २०२५–२०२६ मध्ये नागभीड येथील समीधा सेवा संस्था द्वारे संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर येथे झालेल्या या उत्सवात ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान नाटिका पथकाने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

या विज्ञान उत्सवात विज्ञान मॉडेल, रांगोळी, पोस्टर सादरीकरण व विज्ञान नाटिका अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेसोबतच वैज्ञानिक जाणीव दाखवत उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेषतः विज्ञान नाटिकेच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रभावी संदेश दिल्याबद्दल परीक्षकांनी ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले, डॉ. मिलिंद कांबळे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर, स्मिता जीवतोडे संचालिका चांदा पब्लिक स्कूल, आम्रपाली पडोळे प्राचार्या चांदा पब्लिक स्कूल यांची उपस्थिती होती. तसेच विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक सतीश घारे व राजेश कारेमोरे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

ट्विंकल इंग्लिश स्कूलकडून स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे —

रांगोळी स्पर्धेत हरीप्रिया नारनवरे (इयत्ता ८), पोस्टर स्पर्धेत परी अमृतकर (इयत्ता ९), विज्ञान मॉडेल स्पर्धेत यशिका भुरे व शारदा चौधरी (इयत्ता ९), तर विज्ञान नाटिका स्पर्धेत राधिका गावंडे, झैनब साबरी, श्रावणी शास्त्रकर, निधी हरदिया व आयुषी राजगडकर (इयत्ता ९) यांनी सहभाग घेतला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Previous Post Next Post