Top News

नागभिड नगरपरिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व; नगराध्यक्ष पदा सह 13 जागी काँग्रेस तर भाजपा 6 अपक्ष 1

नागभिड नगरपरिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व; नगराध्यक्ष पदा सह 13 जागी काँग्रेस तर भाजपा 6 अपक्ष 1 



नागभीड : नागभीड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. दोन फेऱ्यांत झालेल्या या मतमोजणीसाठी सुमारे ७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या निवडणुकीसाठी एकूण १० प्रभाग तयार करण्यात आले होते. पहिल्या फेरीत ५ आणि दुसऱ्या फेरीत उर्वरित ५ प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. प्रत्येक टेबलवर मतमोजणी प्रगणक, सहाय्यक व मदतनिसाची नियुक्ती करण्यात आली होती. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन दोन राखीव पथकांचीही व्यवस्था करण्यात आली होती.

मतमोजणी प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप वाघमारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सोनम देशमुख आणि नायब तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश कावळे यांनी लक्ष ठेवले.

दरम्यान, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार नागभीड नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. नगराध्यक्ष पदासह एकूण १३ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला असून, भारतीय जनता पक्षाला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.


प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे :

प्रभाग १ – अमृत शेंडे, किरण पाथोडे (काँग्रेस)

प्रभाग २ – संदीप जीवितोडे, आशा गायकवाड (काँग्रेस)

प्रभाग ३ – सविता संदोकर, नरेंद्र हेमने (काँग्रेस)

प्रभाग ४ – आरजू जुमनाके, जयप्रकाश गजपूरे (काँग्रेस)

प्रभाग ५ – संजय अमृतकर (अपक्ष), सुनीला डोईजड (काँग्रेस)

प्रभाग ६ – शिल्पा विनय शेंडे, अवेश पठाण (भाजप)

प्रभाग ७ – सुजाता राऊत (काँग्रेस), सचिन आकुलवार (भाजप)

प्रभाग ८ – हेमंत नन्नावरे (भाजप), सुवर्णा टिपले (काँग्रेस)

प्रभाग ९ – प्रिया लांबट, गणेश तर्वेकर (भाजप)

प्रभाग १० – सोनाली दांडेकर, प्रतिक भसीन (काँग्रेस)

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या स्मिता खापर्डे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, भाजपचे उमेदवार लोमेश दुधे यांचा पराभव झाला आहे.

या निकालांनंतर उपनगराध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरातील विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व इतर नागरी सुविधांबाबत मतदारांनी नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींंकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या असून, नगरपरिषदेच्या पुढील कामकाजाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous Post Next Post