नागभीडच्या अभिषेक ची बिग बॅश लीग T20 नागपूर मध्ये निवड.....दत्तावाडी चॅलेंजर्स संघात सामील.
नागभीड :: नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीग T20 स्पर्धेच्या निलामीत नागभीडचा उदयोन्मुख क्रिकेटपटू अभिषेक उरकुडे याची दत्तावाडी चॅलेंजर्स कर्णधार दर्शन कनोजे संघात निवड झाली आहे. या निलामीत एकूण ३०२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी काहींना खरेदीदार न मिळाल्याने ते वंचित राहिले.
साई क्रिकेट अकॅडमी नागपूर येथे नागभीड चा रहिवाशी अभिषेक उरकुडे यांच्यासह प्रथमेश लोहीत. पार्थ गुघाणे आणि करण बिचकुले या चार खेळाडूंना या स्पर्धेत स्थान मिळाले आहे. निलामीचे विशेष आकर्षण म्हणजे IPL खेळाडू अपूर्व वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संपूर्ण निलामीचे प्रसारण YouTube वर थेट करण्यात आले.
बिग बॅश लीग T20 नागपूर ही स्पर्धा IPL वरून प्रेरित असून सर्व नियम व अटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. विजेत्या संघाला तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रसारण YouTube आणि Smart TV वर करण्यात येत आहे.
नागभीड तालुक्यातील रानपरसोडी येथील छोट्या खेड्यातून क्रिकेटची सुरुवात करून अभिषेक आज मोठ्या व्यासपीठावर पोहोचला आहे. त्याची निवड ही त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. अभिषेकसारखे अनेक गुणी खेळाडू ग्रामीण भागात दडलेले असून अशा लीगमुळे त्यांना हवेसे प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र आहे.

