बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीचा ठाणेदारांना निवेदन : अवैध धंद्यांवर व दारूच्या दुकानांवरील गोंधळावर आळा घालन्याची मागणी
बल्लारपूर | गौतम कांबळे | उपसंपादक : बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर तसेच दारूच्या दुकानांवरील गोंधळावर आळा घालण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.
हनुमान वार्डातील टिपले वाईन शॉप व शेजारील दारू दुकानासमोर नागरिक दारू घेऊन रस्त्यावर उभे राहून पिणे, भांडणे करणे, अश्लील वर्तन करणे यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषत: महिलांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील इतर दारू दुकानांपुढेही गाड्या उभ्या करणे, रस्त्यावरच दारू पिणे, या प्रकारांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत असून चोरीसारख्या घटनांतही वाढ होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पोलिसांनी गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, हायवेवरील शाळेसमोर मोठ्या ट्रकांची पार्किंग केली जाते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तातडीने हे ट्रक हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली.
हे निवेदन शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष ताहिर हुसैन यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदारांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस सचिव दौलत बुंदेल, सोशल मीडिया प्रमुख शेख कासिम, व्यापारी मंडळाचे हरीश चुक, महासचिव सैयद अजीज, उपाध्यक्ष बशीर खान, किशोर नागराले, अमजद खान, साई, संजय बोमले, नजीर सैयद, ताहिर शेख, श्रीनिवास निजानप, मोनू शेख, अंकित मोरे, संजय उपटलवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
