Top News

चंद्रपूर पोलिसांचे मोठे यश.....ऑपरेशन शोध मोहिम यशस्वी Operation_Search_Mission

चंद्रपूर पोलिसांचे मोठे यश.....ऑपरेशन शोध मोहिम यशस्वी



चंद्रपूर  : हरवलेले, पळविलेले किंवा घरून निघून गेलेले आपल्या प्रियजन पुन्हा कुटुंबाच्या मिठीत!  हे स्वप्न चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन शोध (Operation Search Mission) मोहिमेतून प्रत्यक्षात उतरवले आहे. अवघ्या 10 दिवसांत तब्बल 60 मुले, मुली, महिला आणि पुरुषांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय स्तरावर 7 पथके तर जिल्हा स्तरावर 1 पथक अशा एकूण 8 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांनी सतत शोधमोहीम राबवत हरवलेल्यांचा मागोवा घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडले.

चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेले नातेवाईक किंवा ओळखीचे आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.


Previous Post Next Post