DBT–DLC मध्ये दुरुस्तीसाठी महसूल सप्ताहात विशेष शिबीर; लाभार्थ्यांसाठी घरपोच सेवा आणि विशेष सुविधा
बल्लारपूर / महसूल सप्ताहाच्या पाचव्या दिवशी, दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी बल्लारपूर तहसील कार्यालयात DBT (Direct Benefit Transfer) व DLC (Digitally Linked Certificate) प्रणालीत दुरुस्ती करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणानुसार शासकीय अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होत असल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी DBT पोर्टलवरील नोंदणी व प्रमाणीकरण आवश्यक आहे.
DBT प्रणाली डिसेंबर २०२४ पासून प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. मात्र तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न न झाल्यामुळे त्यांना अनुदान मिळण्यात अडथळे येत आहेत. ही गरज लक्षात घेऊन महसूल सप्ताहाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व गावांमध्ये गृहभेटी घेतल्या गेल्या, तसेच तहसील कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करून संगायो व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती पोर्टलमध्ये दुरुस्त करण्यात आली.
या शिबिराचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी नायब तहसीलदार महेंद्र फुलझेले, अजय मलेलवर, सतीश साळवे, निरीक्षण अधिकारी कु. प्राजक्ता सोमलकर, मंडळ अधिकारी किशोर नवले, सुजित चौधरी, ग्राम महसूल अधिकारी अकोजवार, कंबलवार, झाडे, चांदेकर, नौकरकर, निंबाळकर, कु. मडावी, सहाय्यक महसूल अधिकारी आरती दुलत, दीपक वडूळे, सुनिल तुंगीडवार, अजय देवतळे, कु. सोनू गावंडे, कु. निलम नगराळे, सेतू केंद्र चालक दीपक मांढरे, रायपुरे, दुबे, नाईक, तसेच महसूल कर्मचारी पुंजाराम राऊत, अमोल डोंगरे, संदीप वेटे, सुमित वाटगुळे, कचरु गेडाम, कु. प्राची गुजनवार यांचे विशेष योगदान लाभले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना अनुदानाच्या प्रवाहात आणण्यात यश आले आहे. महसूल विभागाच्या या प्रयत्नांमुळे गावपातळीवरील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
