स्व. किशोरभाऊ वनमाळी पुण्यस्मरणानिमित्त गांधी महाविद्यालयात रक्तदान-रोगनिदान शिबिर; १६ जणांचे रक्तदान, ४६ जणांची तपासणी
नागभीड :: रक्तदान हेच जीवनदान, (Blood donation is the donation of life.) रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयामध्ये रक्तपेढीतील रक्ताचा साठा कमी पडू नये. तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे आणि रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथिल प्राणीशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व श्री. साईनाथ ब्लड बँक अन्ड कंम्पोनंट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. किशोरभाऊ वनमाळी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये ‘रोगनिदान व रक्तदान शिबिराचे’ (Diagnostic and blood donation camp) आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जी. डी. देशमुख यांनी भूषविले होते प्रमुख अतिथी श्री. साईनाथ ब्लड सेंटर, नागपूरचे संचालकडॉ. अनिल ढोणे होते तर मार्गदर्शक डॉ. विकास मोहतुरे तर कार्यक्रमाला डॉ . आर. जे. रुडे, प्रा. किशोर बोरकर यांची विशेष उपस्थिती लाभली .
डॉ. विकास मोहतुरे यांनी मार्गदर्शन करतांना ‘रक्तदान सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान आहे असे सांगून सर्वांनी रक्तदान केले पाहिजे’ असे सांगितले. डॉ . आर. जे. रुडे व प्रा. किशोर बोरकर यांनी ‘ आपल्या महाविद्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा हि नागभीडसाठी भूषणावह बाब असे आपल्या भाषणातून नमूद केले. तर डॉ. ढोणे यांनी रक्तदानाचे महत्व सांगून त्याची समाजासाठी असलेली उपयुक्तता स्पष्ठ केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. डी. देशमुख यांनी ‘ स्व. किशोरभाऊ यांच्या स्वप्नातील एक आदर्श महाविद्यालय घडविण्यासाठी आपणास निरंतर प्रयत्नशील असणे गरजेचे आहे असे सांगून रक्तदानाचा उपक्रम हा सामाजिक सेवा साधण्याचा उपक्रम आहे त्यासाठी सर्वांनी रक्तदान करा असे आव्हान सर्वांसमोर केले.
सदर शिबिरामध्ये एकूण ४६ व्यक्तींचे स्वस्थ तपासणी करिता प्रतिसाद दिला व त्यामधील १६ व्यक्तींनी रक्तदान करून रक्तदानाचे अमूल्य कार्य करत समाजाप्रती आपली ऋणानुबंधाची बांधिलकी जपली. या सोबतच स्व. किशोरभाऊ वनमाळी यांच्या पुण्यास्मारणाच्या औचित्याने प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने अवयव दान या विषयाला अनुसरून रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रचल ढोक यांनी तर आभार प्रा. चक्रधर भुर्रे यांनी मानले. सदर शिबिराच्या यशस्वितेकरिता समस्त प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी व श्री साईनाथ ब्लड सेंटर, नागपूर यांचे अमूल्य योगदान लाभले.
