Top News

लोटस डायनॅमीक्स युथ फाउंडेशन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.....आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा भव्य उत्साहात संपन्न

लोटस डायनॅमीक्स युथ फाउंडेशन तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव.....आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा भव्य उत्साहात संपन्न......



नागभीड  :: आमदार  कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त लोटस डायनॅमीक्स युथ फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण दिनांक १९ जुलै रोजी त्यांच्या शुभहस्ते गणेश मंगल कार्यालयात नागभीड येथे पार पडले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

चित्रकला स्पर्धा गट 'अ' आणि गट 'ब'.... 'अ' गटात चौथी ते सातवी आणि ''ब' गटात 8 वी ते 10  वी अशा दोन प्रमुख विभागांमध्ये विभागली गेली होती.. विद्यार्थ्यांनी▪️ऑपरेशन सिंदूर, ▪️एक पेड माके नाम, ▪️शिवकालीम किल्ले यां विषयांवर आकर्षक चित्रे सादर केली. त्यांच्या सर्जनशीलतेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

विजेत्यांची यादी :

  • 🔸 "अ" गटा (इयत्ता 4थी ली ते 7 वी)
  • 🥇 प्रथम क्रमांक : इहेम गीतेश खोब्रागडे 
  • 🥈 द्वितीय क्रमांक : तीलक ओम मेश्राम 
  • 🥉 तृतीय क्रमांक: यश्मिता अमित भालेराव
  • 🟦 'ब' गट (इयत्ता 8वी ते 10 वी)
  • 🥇 प्रथम क्रमांक : केतकी महेंद्र किणेकर - 
  • 🥈 द्वितीय क्रमांक:  स्वरा मिरे 
  • 🥉 तृतीय क्रमांक : जोशीता गोपाल साखरकर

विशेष उल्लेखनीय कलाकार म्हणून प्रोत्साहनपर बक्षीस

  • शरवरी संदीप गिरीपुंजे 
  • राणू सुरेश मांढरे 
  • हिरप्रिया संजय नारनवरे
  • श्रद्धा प्रकाश पाथोडे
  • परी टैलानि

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना अभ्यासासोबतच कलाक्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले.

विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व आकर्षक शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले.

 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व सामाजिक विषयांवरील जागरूकता निर्माण झाली.

या उपक्रमाचे आयोजन लोटस डायनॅमीक्स युथ फाउंडेशन तर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  फाउंडेशन चे प्रियंका कोरे, पराग गुंडेवार, हुमेश अमृतकर,वृत्विक मेश्राम,विपुल आंबोरकर,प्रांजली मुंगले, रितेश गोडे, तेजस सोनट्टक्के, भूषण नारनवरे, गुड्डू भोयर, राजू मिसार, विजय संदोकर इ. अथक परिश्रम घेतले.  आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post