आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा..!!

आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा..!! 


नागभीड : भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड चे वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार  कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. नागभीड शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी च्या विविध हनुमान चालीसा पठन, ग्रामीण रुग्णालय नागभीड शाळा, रुग्णांना फळ वितरण लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशन व भाजपा नागभीडच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यात 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्वप्रथम प्रथम कन्यारत्न झालेल्या दांपत्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची फिक्स डिपॉझिट, अनेक होतकरू युवकांना तीन चाकी इलेक्ट्रिक रिक्षाचे वाटप,लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, नागभीड तालुक्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना मत्स्यबीज खरेदीसाठी प्रत्येकी 50 हजार चे अर्थसहाय्य वितरण करण्यात आले. तसेच नगरपरिषद नागभीड अंतर्गत शिवटेकडी परिसरात वृक्षारोपण, ट्विंकल इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी व शिक्षकासोबत वाढदिवस साजरा करण्यात आला, बेसिक प्राथमिक शाळा येथे शाळा इमारत नूतनीकरण कार्यारंभ कार्यक्रमाचा शुभारंभ भाऊंच्या हस्ते करण्यात आला व विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला, सोबतच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नागभीड येथे आमदार श्री. कीर्तीकुमार भांगडिया यांनी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवणुकीत विजयात महत्वाची भूमिका निभावात एकहाती सत्ता मिळविल्याने त्यांच्या नवनियुक्त संचालक गणेश तर्वेकर व अवेश पठाण यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मनी प्लांट चे रोपटे भेट देत सत्कार करण्यात आला.. तसेच नवनियुक्त संचालक गणेश तर्वेकर व आवेश पठाण यांचा बँकेच्या व्यवस्थापक व कर्मचारी यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच विविध सामाजिक व सेवाभावी संस्था यांनी उपस्थिती दर्शवत आ.बंटी भांगडिया यांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, नागभीड तहसील चे तहसीलदार प्रताप वाघमारे, गुन्हे शाखेचे काचोरे, नागभीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सोनम देशमुख, नागभीड च्या गटविकास अधिकारी स्नेहल लाड, तालुका कृषी अधिकारी पूजारी , आरमोरी च्या तहसीलदार चौधरी  यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर माजी मंत्री डॉ. रमेश कुमार गजभे, आदिवासी नेते दामोधर वाढवे, माजी आमदार भाजप नेते डॉ.नामदेव उसेंडी, प्राचार्य डॉ. अमीर धमानी, भाजप ज्येष्ठ नेते मोरेश्वर ठीकरे, वसंत वारजूरकर, राजू देवतळे, संजय गजपुरे, मंडळ अध्यक्ष संतोष रडके, हेमराज लांजेवार, सुधीर दोनाडकर,  डॉ, दिलीप शिवरकर, ऍड. रवींद्र चौधरी, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य देविदास चिलबुले, उपाध्यक्ष अजय काबरा, युवा उद्योजक व भाजपा नेते गौरव अशोक भैया, दिपक उराडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश तर्वेकर, अवेश पठाण, न.प.माजी सभापती सचिन आकुलवार,  आनंद कोरे, रामदास बहेकार, ईश्वर मेश्राम,  जहांगीर कुरेशी, ढिवर भोई समाजाचे अध्यक्ष गुलाबराव भानारकर,भाजपा जिल्हा महामंत्री प्रिया लांबट,भाजपा महिला शहर अध्यक्षा नितु येरणे, या सह विविध पादाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.