Breaking news.... 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर....
चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात "रेड अलर्ट" दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. तसेच नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र. 07172 - 250077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.