समिधा सेवा संस्थेतर्फे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया व संस्थेचे सचिव अजय काबरा यांचा वाढदिवस संयुक्तपणे उत्साहात साजरा....

समिधा सेवा संस्थेतर्फे आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया व संस्थेचे सचिव अजय काबरा यांचा वाढदिवस संयुक्तपणे उत्साहात साजरा....


नागभीड : समिधा सेवा संस्थेतर्फे संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल आणि सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तिकुमार उर्फ (बंटी) भांगडिया आणि समिधा सेवा संस्थेचे सचिव तथा मार्गदर्शक  अजय काबरा यांचा संयुक्त वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या विशेष प्रसंगी शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या, फुग्यांची सजावट व विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे वातावरण आनंदमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, नृत्य सादरीकरण, आणि देशभक्तीपर गीतांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले.

आमदार भांगडिया यांचा सत्कार

या सोहळ्यात आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आणि वाढदिवसाची भेट स्वरूपात श्रीमद् भगवतगीता प्रदान करण्यात आली . त्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना यशाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. "विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले .

समिधा सेवा संस्थेचे सचिव अजय काबरा यांनी आपल्या भाषणात शाळेची वाटचाल, सामाजिक कार्यातील सहभाग व ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार यावर प्रकाश टाकला. "मुलांना फक्त पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यातील कला, आत्मविश्वास व सामाजिक जाणिवा जागृत करण्याचे कार्य आम्ही करतो आहोत," असे ते म्हणाले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास समिधा सेवा संसस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, प्राचार्या शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा जीभकाटे नवखरे, बल्लारशाह चे माजी नागराध्यक्ष  लखनसिहं चंदेल, प्रसिद्ध व्यवसायी अभिषेक मालू , ब्रम्हपुरी चे माजी नगरसेवक गौरव अशोक भैया,  इजी. राकेश सोमाणी, सुमित डोहाणे, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी तसेच नागभीड तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू व चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता

 संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात पार पडला. दरम्यान स्कुल च्या कर्मचाऱ्यांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. एकत्रित वाढदिवसाचा हा उपक्रम गेल्या 11 वर्षांपासून  सुरु असून समाजात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे. कार्यक्रमाचे संचालन अल्का धोटे तर शैलेश भुरसे यांनी उपस्थितांचे आभार मानले .