भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत विविध समस्याचे मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन.....
नागभीड : नागभीड नगर परिषदेच्या नवनियुक्त मुख्याधिकारी सोनम देशमुख यांची भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. या बरोबरच नागभीड नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील समस्या कश्या सोडविता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने पावसाळ्याचे दिवस असल्याने पथदिव्यावर दिवे नसल्याने होणारी अडचण लक्षात घेता या समस्येकडे पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. यावर एका कंपनी कडे पथदिवे लावण्याचे व त्याच्या दुरुस्तीचे काम दिले आहे त्यांच्याकडे निधी नसल्याने हे काम अपूर्ण राहिले होते. मात्र चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी नगरोत्थान मधून निधी मिळवून दिल्याने लवकरच पथदिव्यांची दुरुस्ती व ज्या ठिकाणी दिवे नाहीत तिथे दिवे लावण्याचे काम लवकरच सुरु करीत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. या बरोबर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले असून त्या ठिकाणी मुरूम व चुरी टाकून बुजविण्याची मागणी करण्यात आली. तसेच पाणी पूरवठा योजनेचे राहिलले नळ जोडणी लवकरात लवकर जोडून जबाबदारी मागणी करण्यात आली योजनेच्या समस्या कश्या सोडवता येईल यावर चर्चा करण्यात आली. गटार लाईन चे काम पावसाळा असल्याने चार महिने थांवबून ज्या रस्त्यावर खोदकाम केले आहे त्या ठिकाणी ते बुजविण्याची मागणी करण्यात आली. याला सकारात्मक उत्तर देताना सध्या हे काम थांबवुन ज्या ठिकाणी रस्ते फोडन्यात आले आहेत त्या ठिकाणी काँक्रेटिंग करून रोलर ने दबाई करण्याचे काम सुरु करीत असल्याचे सांगितले. पावसाळ्यात डासांचे प्रादुर्भाव वाढत असल्याने फवारणी करण्याची मागणी करण्यात आली. या सह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. व निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा नेते माजी प्राचार्य डॉ.अमीर धमानी, माजी जि. प. सदस्य व भाजपा महामंत्री संजयजी गजपुरे, अजयजी काबरा, भाजपा जिल्हा महिला महामंत्री प्रिया लांबट, मंगेश सोनकुसरे, पराग भानारकर सह अन्या कार्यकर्ते उपस्थिती होते.