विदर्भातील उत्कृष्ट शिक्षण दूत, सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते गणेश तर्वेकर यांचा सत्कार संपन्न.....
नागभीड :: समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांचा समिधा सेवा संस्थेच्या सभागृहात कोटुंबिक कार्यक्रमात सत्कार संपन्न झाला. गणेश तर्वेकर हे विदर्भातील उत्कृष्ट शिक्षण दूत तथा चिमूर विधानसभा क्षेत्रातील नावाजलेले राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. तर्वेकर हे विदर्भातील नागपूर येथील उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गवळी उच्च प्राथमिक विद्यालय तथा उदय माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय चे अध्यक्ष आहेत . त्याच बरोबर ते भंडारा जिल्हातील पौनी येथील वैगंगा शिक्षण संस्था द्वारे संचालित वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालया चे अध्यक्ष तर नागभीड तुक्यातील समिधा सेवा संस्था द्वारे संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल तथा सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष आहेत.
शैक्षणिक क्षेत्रा सह ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात सुद्धा अग्रेसर आहे. भाजपा चिमूर विधानसभा निवडणुक प्रमुख, कृ. उ. बा. समिती. चे संचालक, श्री विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष, धनश्री पतसंस्थेचे संचालक या पदी ते कार्यरत आहे. आष्टेडू आखाडा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, किक बॉक्सिंग स्पोर्ट असोशियन चंद्रपूर जिल्हा सचिव पदी कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची चंद्रपूर जिल्हा माध्यवर्ती (CDCC) बँकेच्या संचालक पदी अविरोध निवड झाली आहे. नागभीड नगर परिषद चे प्रथम उपाध्यक्ष पद सुद्धा त्यांनी भूषविले आहे. गणेश तर्वेकर हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात सक्रीय आहेत.
त्यांच्या अनेक वर्षाच्या सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील कामाची दखल घेत समिधा सेवा संस्थेच्या सभागृहात संस्थेचे सचिव अजय काबरा यांच्या प्रमुख उपास्थितीत एका कौटुंबिक कार्यक्रमात श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड व सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी समिधा सेवा संस्थेचे सचिव अजय काबरा, ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा नवखरे जीभकाटे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व गणेश तर्वेकर मित्र परिवार मोठ्या संख्येने या सत्कार सोहळा कार्यक्रमात उपस्थित होते.