सर्वे नंबर 307 बामणी येथील पूर प्रभावित क्षेत्रामध्ये अवैध रित्या लेआउट टाकून जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरुद्ध कार्यवाही करा - सुरज चौबे तालुका अध्यक्ष (कामगार सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बल्हारशाह)

सर्वे नंबर 307 बामणी येथील पूर प्रभावित क्षेत्रामध्ये अवैध रित्या लेआउट टाकून जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरुद्ध कार्यवाही करा - सुरज चौबे तालुका अध्यक्ष (कामगार सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बल्हारशाह)




नागभीड ::  बामणी येथील सर्वे नंबर 307 येथे पूर प्रभावित क्षेत्रामध्ये अवैध रित्या लेआउट टाकून जनतेची फसवणूक करणाऱ्या कंपनी विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालक मंत्री अशोक उईके व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनात मार्फत  सुरज चौबे तालुका अध्यक्ष, कामगार सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बल्हारशाह यांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, बामणी येथील 307 सर्वे नंबर असलेल्या भूभागावरती एलिव्हेट कंपनीकडून लेआउट टाकण्यात आलेला आहे व तो लेआउट जनतेला विकण्यात आलेला आहे. 

सर्वे नंबर 307 ही जमीन शासनानुसार पूर प्रभावित आहे. नेहमी नदीच्या पुराने ह्या जमिनीवरती मोठ्या प्रमाणात पाणी येत असते तरीसुद्धा या जमिनी वरती लेआउट टाकण्यात आले व ते लोकांमध्ये विकण्यात येत आहे. तरी ही बाबा गंभीर असून जनतेची फसवणूक होत तर नसेल न? याची सविस्तर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल चे बल्हारशाह तालुका अध्यक्ष यांनी निवेदनातून केली आहे. या वेळी अनिल (बबलू)  बोराडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.