नागभीड येथील जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेशोत्सव संपन्न...

नागभीड येथील जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेशोत्सव संपन्न...



 नागभीड  ::  जनता शिक्षण संस्था नागभीड द्वारा संचालित जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेशोत्सव व नव्याने प्रवेशित विद्यार्थिनींचा स्वागत सोहळा नुकताच संपन्न झाला. 

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाकरिता एक योग्य व आपल्या जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विद्यालयाची निवड करून आपण आपल्या स्वप्नांना उजाळा देत असतो हीच भावना समोर ठेवून सत्र २०२५_२६ मध्ये नागभीड तथा परिसरातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी तालुक्यातील एकमेव मुलींची शाळा असणाऱ्या जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वर्ग पाचवी ते नववी मध्ये आपला पसंती क्रम देत आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. 

उपक्रमशील व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव प्रयत्न करीत असणारे विद्यालय म्हणून कन्या विद्यालयाची ओळख आहे हाच विश्वास कायम ठेवून बहुसंख्य विद्यार्थिनी या विद्यालयात प्रवेश घेत असतात. नवी स्वप्ने व आशा घेऊन येणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वागत सत्राच्या पहिल्याच दिवशी उत्साहात करण्यात आले. लेझीम व बँड पथकासोबत विद्यार्थिनींनी विद्यालयात प्रवेश केला , विद्यार्थिनींचे औक्षवंत करून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, विद्यार्थिनींना विद्यालयाच्या उपक्रमांची ओळख करून देणारी एक चित्रफित डिजिटल क्लासरूम मध्ये दाखविण्यात आली, व सोबतच सर्व विद्यार्थीनींना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाकरिता वैशिष्ट्यपूर्ण, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना व ध्येयांना  उजाळा देणारे सुंदर फलक लेखन आशिष राहूड व रूपाली पाथोडे यांनी केलेले होते ते विद्यार्थिनींचे लक्ष वेधून घेत होते हे विशेष..

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या आर.आर. तरारे, पर्यवेक्षक एस. डी.जाधव, जेष्ठ शिक्षक  धनू नेताम, सतीश नरडंगे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक सतीश मेश्राम यांनी केले तर आभार सुशील कामडी यांनी मानले.


बातमी, जाहिरात, लेख कविता व चारोळी करिता संपर्क - 

पराग गुंडेवार 

संपादक तथा मुख्यसंपादक 

8668781673