आ.भांगडिया यांचे वाढदिवसा निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन
लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशनचा उपक्रम
नागभीड : चिमूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मागील अनेक वर्षापासून अहोरात्र मेहनत घेणारे कर्तव्यदक्ष, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या येत्या १९ जुलै रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशनच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि. १७ जुलै २०२५ रोजी कर्मवीर विद्यालय नागभीड येथे दुपारी १.०० वाजता करण्यात आले आहे. तर आयोजित चित्रकला स्पर्धा 'अ' आणि 'ब' अशा दोन गटात घेण्यात येत असून यापैकी अनुक्रमे 'अ ' गटा मधे इयत्ता चौथी ते सातवी आणि गट ' ब' मधे आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे.
यामध्ये उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय तृतीय अशा सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सोबतच परीक्षेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत. आयोजित चित्रकला स्पर्धेत नावे नोंदविण्याकरिता संपर्क क्रमांक 9960960621,8668781673,7774802360 येथे संपर्क साधून अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.