आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नागभीड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना ई - रिक्षा चे वाटप....
नागभीड :: चिमुर चे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद चंद्रपुर च्या समाजकल्याण विभाग अंतर्गत २० % मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतुन नागभीड तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना ई - रिक्षा चे वाटप करण्यात आले. यासाठी चंद्रपुर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग व जिल्हा समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांचे सहकार्य लाभले.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती व एन टी प्रवर्गातील होतकरु युवक व युवतींना ७५ % सबसिडीवर ई रिक्षा प्राप्त होत आहे. यात मालवाहक व प्रवासी ई- रिक्षा असे दोन्ही पर्याय उपलब्ध असून यामुळे स्वयंरोजगाराची अनेकांना संधी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात अनेक पात्र लाभार्थ्यांना यापूर्वी याचे वाटप करण्यात आले आहे. अनेक कुटुंबाना यातुन रोजगार मिळाला असून उदरनिर्वाहाची सोय झाली आहे.
महाराष्ट्रात केवळ चंद्रपुर जिल्हा परिषद मध्येच २०% मागासवर्गीय कल्याणकारी योजनेतुन ई- रिक्षा देण्यात येत असून सोबतच समाजातील वंचित घटक समजल्या जाणाऱ्या पात्र दिव्यांग व्यक्तींनाही जि.प. समाजकल्याण विभागामार्फत ई- रिक्षा चे वाटप करुन त्यांना अर्थार्जनाची सोय उपलब्ध करण्यात जि.प. चंद्रपुर चे प्रशासन यशस्वी ठरले आहे.
नागभीड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना ई- रिक्षा ची चावी सन्मानपुर्वक देण्यात आली. याप्रसंगी नागभीड पंचायत समिती च्या संवर्ग विकास अधिकारी स्नेहल लाड , नागभीड नगरपरिषद च्या मुख्याधिकारी सोनल देशमुख, माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे , माजी पं.स. सदस्य संतोष रडके , कृ.उ.बा.स. नागभीड सभापती आवेश पठाण, ज्येष्ठ भाजपा नेते मोरेश्वर पाटील ठिकरे , माजी उपाध्यक्ष न. प. नागभीड गणेश तर्वेकर , जेष्ठ नेते वसंत वारजुकर , प्रा. अमिर धम्माणी , माजी बांधकाम सभापती न. प. नागभीड सचिन आकुलवार , ॲड. रविन्द्र चौधरी, अजय काबरा ईत्यादी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
