नागभीड शहरात झाले शव फ्रिजर उपलब्ध.....आमदार बंटी भांगडिया यांचे सहकार्य...
नागभीड :: चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या सहकार्याने नागभीड शहरात शव फ्रिजर उपलब्ध झाले. सदर फ्रिजर ची मागणी स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी केल्या वर आवश्यकता बघता आमदार भांगडिया यांनी त्वरित मागणी पूर्ण करीत शव फ्रिजर उपलब्ध करून दिले. सदर फ्रिजर चे लोकार्पण आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात, भाजपा चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांच्या हस्ते भाजपा कार्यालयात संपन्न झाले.
या वेळी माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, भाजपा जेष्ठ नेते धनराज काटेखाये, अजय काबरा, रमेश ठाकरे, संजय मालोदे, डॉ.पवन नागरे, युवा नेता गुड्डू भोयर सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️सदर फ्रिजर भाजपा कार्यालय नागभीड येथे उपलब्ध राहणार आहे .