Top News

ना.नितेश नारायण राणे यांची आमदार बंटी भांगडिया यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट....

ना.नितेश नारायण राणे यांची आमदार बंटी भांगडिया यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट.... 


नागभीड : राज्याचे बंदर विकास व मस्य व्यवसाय मंत्री ना.नितेश नारायण राणे हे गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जात असताना नागभीड येथील चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या नागभीड येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 


 मंत्री नितेश राणे यांनी नागभीड तालुक्यातील मासेमारी  व्यवसायचा आढावा घेतला व तालुक्यातील मासेमारी संस्थांची स्थिती जाणून घेतली व पुढील काळात मासेमारी संस्थासाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले. 

यावेळी भाजपा नेते विलास विखार, चिमूर भाजपा विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेश पठान, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार, माजी समाजकल्याण सभापती ईश्वर मेश्राम, भाजपा कार्यकर्ते पवन नागरे, शुभम चिल्लुरे, पराग भानारकर यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post