Top News

जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण.

 जिल्हा स्मार्ट ग्राम कळमना येथे पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण. 



चंद्रपूर / राजुरा - मनोज श्रीहरी गोरे उपजिल्हा प्रतिनिधी :-- जिल्हा स्मार्ट ग्राम तथा आदर्श गाव कळमना हे राजुरा तालुक्यातील एक उपक्रमशील गाव असून येथे स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि पर्यावरण पूरक, नाविन्यपूर्ण उपक्रम  सातत्याने राबविले जातात. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाबरोबरच पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व लक्षात घेऊन येथे अनेक फळ, फुल व शोभिवंत झाडे सातत्याने लावली व जगवली जात आहेत. आज पर्यावरणा दिनानिमित्त येथे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.  

         या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, ग्रामसेवक सिताराम मरापे, विठ्ठलराव वाढई कोषाध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, जेष्ठ नागरिक भाऊराव कावळे, निलकंठ वाढई, पांडुरंग क्षिरसागर,  श्रावण गेडाम उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते संदीप गिरसावळे, ज्ञानेश्वर बोढे, गिरिजा वाढई, बोढे बाई, नत्थु वसाके स्वच्छता दुत, सुनील

 मेश्राम,भारत टेकाम यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post