वट पोर्णिमा निमित्य महिला वनरक्षकांनी केले वट वृक्षांचे वृक्षारोपण......
चंद्रपूर :: मोहर्ली वनपरिक्षेत्रातील महिला वनरक्षक कु. आरती आईटलावार, वनरक्षक मोहर्ली-1 यांच्या पुढाकाराने महिला वनरक्षक कु. सुमैया सिद्धिकी, वनरक्षक देवाडा, कु. टीना काळे, वनरक्षक पद्मापूर-।, सौ. शितल चौधरी, वनरक्षक पद्मापूर-II, कु. माया बुरडकर, वनरक्षक चिचोली, संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली, सुरेंद्र मंगाम, वनरक्षक सितारामपेठ, विखुल जनबंधू, वनरक्षक मुधोली यांनी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात वट सावित्रीच्या निमित्ताने वट वृक्षाची लागवड करून जतन व संगोपन करण्याचा निर्धार केला. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. यां वेळी वट वृक्षाचे महत्व यावर सविस्तर माहिती देण्यात आली.