Top News

भाजपा नागभीडच्या शिष्टमंडळानी द. पू. म. रेल्वे बिलासपूर झोप चे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून दिले निवेदन...

भाजपा नागभीडच्या शिष्टमंडळानी द. पू. म. रेल्वे बिलासपूर झोप चे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून दिले निवेदन....

            



    नागभीड :   दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपुर झोन चे महाप्रबंधक तरुण प्रकाश हे चांदाफोर्ट वडसा रेल्वे लाईनचे परीक्षणासाठी एक दिवसीय दौऱ्यावर आले असतांना नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशन वर तांत्रिक व संरक्षा  पाहणी साठी आले असताना भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करून निवेदन दिले. 

           सविस्तर वृत्त असे की आमदार बंटी भांगडिया आणि द.पु.म. रेल्वे बिलासपुर झोन चे झेडआरयुसीसी  सदस्य संजय गजपुरे यांचे मार्गदर्शनात भाजपा नेते अजय काबरा ,  नगरपरिषद माजी सभापती सचिन आकुलवार व चिमूर विधानसभा संघटन प्रमुख शक्ती केराम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने द.पु.म. रेल्वे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांची भेट घेऊन नागभीड च्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या / समस्यां सोडविण्याबद्दल सकारात्मकता दर्शविली . 

 याप्रसंगी विशेषतः 220 KV पॉवर स्टेशन ( चिखल परसोडी) ते 33 KV पॉवर स्टेशन नागभीड पर्यंत सर्विस लाईन टाकण्यात येण्यासाठी रेल्वेच्या NOC ची गरज आहे . ती NOC मिळवून देण्यासाठी विनंती केली जेणेकरून नागभिडकरांची नेहमी लाईट जाण्याची समस्या कायमची सुटेल अशी अपेक्षा आहे . याबाबत आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांनी आश्वस्त केले. 

                   यासोबतच नागभीड ब्रम्हपुरी रोडवर बगीच्यासाठी रेल्वेच्या अधिनस्थ असलेली 2 एकर जागेची नागभीड नगरपरिषद प्रशासनाकडून मागणी केली असुन त्यालाही मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. नागभीड जंक्शन हे अनेक जिल्हे व तालुक्यांसाठी मध्यभागी असल्याचे महत्व पटवून दिले. या परिसरात अनेक पर्यटन स्थळे 

  • घोडाझरी अभयारण्य  
  • शिवटेकडी 
  • गायमुख देवस्थान 
  • सातबहिणी चा डोंगर 

तसेच इतर इ. स्थळी जाण्यासाठी पर्यटकांना नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशन जवळचे पडत असल्याने या मार्गावरून चालणाऱ्या सर्वच एक्सप्रेस रेल गाड्यांना नागभीड जंक्शन येथे थांबा देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली . 

                    यावेळी द.पु.म. रेल्वे नागपुर मंडल प्रबंधक दीपक कुमार गुप्ता , नागभीड रेल्वे स्टेशन प्रबंधक नगराळे यांच्यासह बिलासपुर झोन व नागपुर मंडल चे विविध विभागाचे अनेक वरिष्ठ रेल्वे अधिकारी, पत्रकार, व्यापारी व रेल्वे प्रवासी यांची उपस्थिती होती.

बातमी, लेख, कविता आणि जाहिराती करिता संपर्क साधा | पराग गुंडेवार - मुख्यसंपादक तथा संपादक | 8668781673

Previous Post Next Post