मोठा विमान अपघात...लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 9 मिनिटांतच कोसळलं...

मोठा विमान अपघात...लंडनला जायला निघालेलं एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर अवघ्या 9 मिनिटांतच कोसळलं...



विमानात भारतीय, ब्रिटिश, कॅनडा आणि पोर्तुगालचे नागरिक असल्याची माहिती.....



अहमदाबाद ::  गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान अपघाताचे वृत्त समोर आले आहे.  आज गुरुवारी (12 जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले, या घटनेचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादमधील मेघानीनगर भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसून येत आहेत, तर धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत. अहमदाबाद विमानतळावरून (Ahmedabad Plane Crash) विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच मेघानीनगरजवळ कोसळले. विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या विमानात 242 प्रवासी होते. यात अनेकांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्यापही मृत्यू चीं संख्या स्पष्ट झालेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघात झालेल्या विमानाचा एक पंख तुटून पडला आहे असे दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते. हे विमान एअर इंडियाचे आहे, अशी माहिती आहे. 



विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान


परिसरात मोठ्या गोंधळाचे वातावरण आहे, हा भयानक अपघात पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि परिसरातील लोक इकडे तिकडे धावत आहेत. विमानाचे बहुतेक भाग जळून राख झाले आहेत. विमान ज्या इमारतीवर पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त होते आहे. विमानतळाजवळ सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.

https://x.com/AHindinews/status/1933098400141996334?t=du_Ih8PSWQWQfjZN876QPg&s=19

विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसत आहे. घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून मोठे धुराचे लोट वरती जाताना दिसत आहेत. बीएसएफ आणि एनडीआरएफच्या पथकांना अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. अहमदाबादच्या सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला. 

 गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, असे सांगितले जात आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विमान कोसळताच मेघानी नगर परिसरात धुराचे मोठे लोट दिसून आले. स्थानिक आणि शासकीय यंत्रणांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले.

विमानाला उड्डाण घेण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतर दुपारी १.४७ वाजता विमानाने उड्डाण घेतले होते. त्यानंतर अवघ्या ९ मिनिटांत हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सदर वृत्ताला दुजोरा दिला असून फ्लाईट AI171 चा अपघात झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.