Top News

The need of the hour is for students to maintain social awareness along with academic excellence - Sanjay Gajpure

शैक्षणिक गुणवत्तेसह सामाजिक भान विद्यार्थ्यांनी जपणे काळाची गरज - संजय गजपुरे


सरस्वती ज्ञान मंदिर शाळेत वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 



             नागभीड ::      २१ वे शतक हे स्पर्धचे असुन  प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्याने त्यात स्वतः ला सिद्ध करण्यासाठी प्राथमिक शिक्षण घेत असताना आपला ज्ञानाचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे , तसेच आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर कठोर परिश्रम करणे फार आवश्यक आहे. यश मिळविण्यासाठी गुणात्मकतेला जितके महत्व देतो तितकेच महत्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले आई वडील,शाळा,शिक्षक यांचे नाव मोठे केले पाहिजे , हिच खरी त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा असते. शाळेत मिळालेल्या गुणात्मक, संस्कारमय व बौद्धिक शिदोरीचा वापर करून आपण जीवनात यश प्राप्त केले पाहिजे तसेच शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त करीत यशाच्या शिखरावर पोहचत असताना ज्या समाजाच्या माध्यमातून मी पुढे आलोय त्या बद्दल सामाजिक भान जपणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे यांनी नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिर च्या वर्ग सातवीच्या विद्यार्थी निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले. 

                 यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे, सहा.शिक्षिका किरण वाडीकर, आशा राजुरकर सहा.शिक्षक आशिष गोंडाने, पराग भानारकर,सतीश जिवतोडे,मेघा राऊत,पूजा जिवतोडे,श्रद्धा वाढई यांची उपस्थिती होती.

                  प्रथमता माता सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करीत दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पानसे  यांनी केले. इयत्ता सहावीची विद्यार्थ्यांनी कु.सान्वी जांभूळे हिने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तर सातवीचे विद्यार्थी कु. लक्ष्मी डहारे, आर्यन खरकाटे,  कु.श्रावणी तोडकर, मोहित ब्राम्हणकर यांनी शाळा व शिक्षक याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता सातवीच्या वतीने छत्रपती शिवाजी म्हाराज यांची प्रतिमा व विविध नकाशे शाळेला एक स्मरण भेट म्हणून दिली , तर शाळेच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा पाणी बॉटल देऊन सत्कार करण्यात आला. 

                  उपस्थित सर्व प्रमुख अतिथी शिक्षक बांधव यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवी व सहावीच्या वतीने विविध गीत व नृत्याच्या माध्यमातून निरोप देण्यात आला तर सातवीच्या विद्यार्थ्यायाकडून समूह नृत्य व फॅशन शो च्या माध्यमातून उपस्थित सर्वांचे मनोरंजन केले. 

                       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावीची विदयार्थिनी कु. ग्रेसी मेश्राम हिने केले तर आभार पराग भानारकर यांनी मानले. गोड जेवणाने सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी अथक परीश्रम घेतले.

Previous Post Next Post