भाजपात प्रवेश केल्याचा राग मनात धरून जातीवाचक आणि चारित्र्यहीन शिवीगाळ करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला प्राणघातक हल्ला...
तालुका काँग्रेस सचिव शरद सोनवाने सहित अन्य ३ लोकांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल...चारही आरोपी फरार...
नागभीड (ता. प्र.) :: नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील तंटामुक्त समिती गिरगाव अध्यक्ष राकेश खोब्रागडे व त्यांचे बंधू सागर खोब्रागडे यांनी ३० सप्टेंबर रोजी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दोन्ही खोब्रागडे बंधू त्यांना मानसिक त्रास देण्याचे वारंवार प्रयत्न करीत राहिले.
परंतु दि.४ ऑक्टोबर रोजी सागर खोब्रागडे ला पुन्हा मानसिकत्रास देण्याचा प्रयत्न केला आणि मिळालेल्या माहिती नुसार त्या नंतर आरोपी शरद सोनवाने,सुधीर बोरकर,संदीप पर्वते,टीनेश कोठेवार यांनी आपल्या अन्य १०-१२ सहकाऱ्यांसोबत गांधी चौक गिरगाव येथे गेले असता दोन्ही खोब्रागडे बंधू सोबत त्यांचा वाद झाला व दोन्ही बंधूंना जातीवाचक आणि चारित्र्यहीन शिवीगाळ करून तंटामुक्ती समिती अध्यक्ष राकेश खोब्रागडे यांना मारहाण केली व सागर खोब्रागडे हे वीडियो बनवत आहे म्हणून आरोपी शरद सोनवाने याने सागर च्या हातून मोबाईल हिसकावला.
त्यानंतर दोन दलित युवकांवर अन्याय केला म्हणून दोन्ही भावंडांनी पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना डेत "ॲट्रॉसिटी" अंतर्गत कलम 296 (b),115 (2), 3(5), 3(1)(r), 3 (1)(s) फ.आय.आर.दर्ज करण्यात आली.सदर आरोपिंच्या घरी पोलीस अटक करण्यासाठी गेले असता चारही आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे.
