Top News

उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने कळमना येथे गोल्डन बांबु ची लागवड.

 उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने कळमना येथे गोल्डन बांबु ची लागवड. 




चंद्रपूर/ राजुरा |मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी -  राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. यात आता गोल्डन बांबूची भर पडली आहे. कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने येथे गोल्डन बांबू ची लागवड करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेने कळमना हे गाव आदर्श करण्यासाठी, गावातील जल, जंगल, जमीन या मुलतवाची जोपासना करण्यासाठी गावात अनेक फुल झाडे, फळ झाडे, शोभीवत झाडे लावली आहेत, कोरोना काळात आकसीजन ची कमतरता सोसावी लागू नये म्हणून स्मशानभूमीत आकसिजन पार्क उभारले आहे. त्यांनी कळमना येथे राजकीय पुढाऱ्यांऐवजी गावातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, बुध्दीमान युवक, बचतगट महिला व गावातील गुरुदेव सेवा मडळ यापैकी सर्व सामान्य माणसांच्या हातून उपक्रमांचे उद्घाटने केली. गावाच्या विकासासाठी गावातील सर्वसामान्य माणसांना, विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. 

         या प्रसंगी श्रावण गेडाम, मारोती पिंगे, मोतीराम झाडे, शामराव चापले, समाधान पेटकर, सुनिता झाडे, नाना मेश्राम, शालु झाडे, शालु बोरकर यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post