Top News

विविध पक्षाला तरुणांचा राम राम ....डोंगरगाव, ता. राजुरा येथील तरुणांचा आम आदमी पक्षात प्रवेश..

विविध पक्षाला तरुणांचा   राम राम ....डोंगरगाव, ता. राजुरा  येथील तरुणांचा आम आदमी पक्षात प्रवेश..



 राजुरा ::  राजुरा विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव येथील तरुणांनी विविध पक्षांच्याखोट्या आश्वासनाला कंटाळून, राजुरा विधानसभा क्षेत्रामधील धडाडीचे नेते सुरज ठाकरे कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपजिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांच्या कामाशी प्रेरित होऊन दिनांक 15/09/2024 रोजी डोंगरगाव येथे सुरज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तथा आम आदमी पक्षाने दिल्ली आणि पंजाब मध्ये जे काम शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, 200 ते 300 युनिट पर्यंत मोफत वीज, रोजगार निर्मिती, महिलांना मोफत बस प्रवास अशा विविध कामांना पाहता आम आदमी पक्षांमध्ये पक्ष प्रवेश केला. 

व येत्या विधासभा निवडणुकीत सुरज ठाकरे सारखे तडफदार, युवा धाडसी नेतृत्व राजुरा विधानसभेतुन निवडून पाठवीन्याची मनशा बोलून दाखवली. व एकीकडे स्थानिक आजी-माजींना राजुरा विधानसभा क्षेत्रामधील नागरिकांनी परत परत संधी दिलेल्या सत्ता उपभोगणाऱ्या  नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्या मधील दिलेले एकही आश्वासन पूर्ण न केल्याने येथील स्थानिक तरुणांच्या मनामध्ये नाराजी असल्याने व दुसरीकडे आमदार खासदार नसताना देखील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सुरज ठाकरे यांचे कामे जनता बघत आहे. त्या कामाला पाहता येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुरज ठाकरे हा नवा चेहरा राजुरा विधानसभा क्षेत्रात परिवर्तन घडवण्याकरिता आम्ही सदैव सोबत राहून काम करू अशी इच्छा व्यक्त केली.  

 या वेळेस पक्ष प्रवेश केलेले तरुण,  संकेत खोब्रागडे, सौरभ रामटेके, शुभम खोब्रागडे, प्रज्वल दुर्योधन, स्वातंत पेडगुरवार, समृद्ध दुर्योधन, सचिन रामटेके, अजय उपरे, आर्यन उपरे, सतीश चव्हाण, निखिल जगताप, अखिल उपरे, दिनेश कुडसंगे, प्रशांत रामटेके, सुरज उपरे,  आदींनी पक्ष प्रवेश केला.

Previous Post Next Post