Top News

कळमना येथे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा : उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हाकेला गावकऱ्यांचा प्रतिसाद.

कळमना येथे पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा : उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हाकेला गावकऱ्यांचा प्रतिसाद. 


चंद्रपूर /राजुरा | मनोज श्रीहरी गोरे :: उपजिल्हा प्रतिनिधी   राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ही ग्रामपंचायत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण पूरक, आरोग्य दायक व शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबविले जातात. यातूनच या वर्षी गणेश उत्सवात माझी वसुंधरा अभियानांतर्गत कळमना येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या पुढाकाराने इको फ्रेंडली पर्यावरण पूरक गणेश उत्सव राबविण्यात आला. या मुळे पाणी दुषीत होण्या पासून वाचणार असून पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होईल. नैसर्गिक संपत्ती आणि तीचे सौंदर्य सदोदित टिकून राहण्यास मदत होईल असा विश्वास कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, राजीव गांधी पंचायती राज संघटनेचे प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई यांनी सांगितले आहे. 

          यावेळी माजी उपसरपंच महादेव ताजणे, ग्रामसेवक सिताराम मरापे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक पिंगे, सचिव दत्ताजी पिंपळशेंडे, कार्यकर्ते विठ्ठल वाढई, नानाजी आबिलकर, गणपती कुकडे, सुरेश गौरकार, देवराव काळे, लटारी गौरकार, मदन वाढई, ज्येष्ठ नागरिक लटारी बलकी, कवडु पिंगे, सुभाष वाढई, पंडीत गेडाम, स्वच्छता दुत नत्थु वसाके, गणेश भक्त रमाकांत वाढई, महिला भगिनी, बयाबाई ताजणे, शशिकला वाढई, शांताबाई निकोडे, संगिता ताजणे, उषाताई वाढई, सुधाकर पिंगे, मारोती अटकारे, दिवाकर वाढई, अमोल कावळे, क्षावण गेडाम, सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post