मीर पठाण, स्वरित गोल्लरवार ने गणेश तर्वेकर तर आदित्य पोहेकर ने साकारली अजय काबरा यांची भूमिका
समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
नागभीड (ता.प्र.) :: समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांच्या मार्गदर्शनात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अजय काबरा, स्कुल च्या प्राचार्या शुभांगी पोहेकर आणि मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली.
वर्ग 10वि चा विद्यार्थी मीर पठाण, स्वरित गोल्लरवार याने संस्थे चे अध्यक्ष गणेश तर्वेकर यांची भूमिका साकार केली तर आदित्य पोहेकर यांने संस्थेचे सचिव अजय काबरा यांची भूमिका साकारली स्कुल च्या प्राचार्याची भूमिका अंतरा पिसे व मुख्याध्यापिका ची भूमिका अवंती चौधरी ने साकारली.
स्कुल मधील सर्वे शिक्षक व विद्यार्थी स्कुलच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी 9:00 वाजता जमले व स्कुलची सजावट केली. स्कुल मधील इयत्ता सातवी ते दहावीचे विद्यार्थी यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. तर काही विद्यार्थ्यांनी स्कुल व्यवस्थापकांची भूमिका बजावली अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खालच्या वर्गांना जाऊन लहान विद्यार्थ्यांचा समोर वर्ग घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून सर्वांनाच आनंद वाटत होता.
दुपारनंतर सर्व विद्यार्थी स्कुलच्या पटांगणावर जमले नंतर पुन्हा शिक्षक दिनाची सांगता म्हणून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी आपापले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले व शिक्षकांचे आभार मानले. शिक्षकांचे महत्त्व हे विद्यार्थी जीवनात किती महत्त्वाचे असते हे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. अशाप्रकारे शिक्षक दिन श्रीमती रामप्यारी देवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे उत्साहाने साजरा झाला.
.jpg)