कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व समाज मेळावा संपन्न.
विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार अंगीकारून सदैव प्रयत्नशील राहावे व यशोशिखर गाठावे - गाडेकर महाराज.
तेल्हारा | मनोज भगत ता.प्र. :: अकोला दि. २८- अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोला तर्फे रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी खंडेलवाल भवन येथे कुणबी समाजातील दहावी,बारावी,जी, नीट तसेच सामाजिक योगदान असलेले असलेल्या व्यक्ती, पूर्व कार्यकारणीचे माजी पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचलेल्या व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी व्यासपीठावर अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिलजी गावंडे हे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच उद्घाटक म्हणून ग्रामगीता प्रचारक तसेच राष्ट्रीय कीर्तनकार शुकदास उद्धवराव गाडेकर हे होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी प्रफुल्ल चौधरी, विलास वडतकर हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डी.वाय.एस.पी. विनोद ठाकरे,प्रसिद्ध विधीज्ञ राजेश कराळे, ,अकोला येथील पी.आय. ट्रेनिंग सेंटरच्या प्रीती ताठे,उरळ येथील ए पी.आय.श्री गोपाल ढोले,दहीहंडा येथील ए.पी.आय. पुरुषोत्तम ठाकरे,अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला येथील अन्न व औषधी प्रशासन निरीक्षक अधिकारी रावसाहेब वाकडे, डॉ. सागर थोटे, नागपूर येथील कामगार नेते अनंतराव भारसाकळे, अकोला येथील कृषी पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण ठोंबरे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव डॉ. गजानन वाघोडे यांनी केले नंतर शैक्षणिक व सामाजिक योगदान असणाऱ्या व्यक्तींचे शाल व श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले त्यामध्ये शुकदास महाराज गाडेकर, नारायणराव गावंडे कुंभारी, प्रा.डॉ. विवेक हिवरे,संजय वडतकर प्रसिद्ध वकील ॲड. राजेश कराळे, संतोषजी भोरे, मंगेशजी शेंडे, गजानन भोपळे,अनिल ढोले प्रशांतजी ठाकरे,आशिषजी अटकर, रोटरीचे अध्यक्ष प्रवीण ढोणे, माजी अध्यक्ष महादेवराव कौसल,देवीदास पोटे, कुणबी समाज मंडळ उमरी अध्यक्ष गजानन थोरात, रावसाहेब वाकडे हवामान तज्ञ, अमोल दुतंडे, श्रीकांत लांडे, ज्योतीताई तिरुख, अर्पित घानमोडे, सामाजसेविका सुमन भालदाने यांनी प्रथम तीन NEET च्या विद्यार्थ्यांना नगदी धनादेश देऊन गौरविण्यात आले नंतर दहावी बारावी मध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालका समवेत सत्कार करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले डी वाय एस पी विनोदजी ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांचा शुकदासजी गाडेकर यांनी ग्रामगीतेतील तुकडोजी महाराजांच्या विचारांचे दाखले देऊन विद्यार्थ्यांना संस्कारासोबतच प्रयत्नशील राहून यश प्राप्त करण्यास सांगितले त्यानंतर कामगार नेते अनंतरावजी भारसाकडे यांनी मार्गदर्शन केले शेवटी अध्यक्षीय भाषणात अनिल गावंडे यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवा व आपली संस्कृती कशी जपता येईल यावर मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना व पुरस्कार प्राप्त समाज बांधवांना भावी वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माव कोल्हे (टिकार),गजानन लासुरकार तर आभार प्रदर्शन आशिषजी हेलगे यांनी केले,कार्यक्रमाचे स्नेहभोजन अन्न व औषधी प्रशासन निरीक्षक रावसाहेब वाकडे यांच्याकडून देण्यात आले.बहुसंख्येने विद्यार्थी पालक समाजातील प्रतिष्ठित मंडळी, अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशिय मंडळाचे पदधिकारी संचालक मंडळ, सदस्य गण उपस्थित होते.
