Top News

जागतिक मराठी भाषा दिन शासकीय स्तरावरून साजरा करण्यात यावा.

जागतिक मराठी भाषा दिन शासकीय स्तरावरून साजरा करण्यात यावा.


जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची मागणी

         


 वणी | जगदीश खनके ता. प्र. :: महाराष्ट्रामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी साहित्य क्षेत्रात ज्यांनी आपले भरीव योगदान दिले. असे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याश्या गावातील.अत्यंत गरीब आणि दलीत कुटुंबात जन्माला येऊनही मराठीची पताका त्यांनी सातासमुद्रापार नेली.आपल्या साहित्यातील कामगिरीने ते रशिया पर्यंत गेले. फक्त दीड दिवस शिक्षण घेऊन लावणी, पोवाडा,कथा,गण, गौळण,कादंबरी,प्रवासवर्णन अश्या अनेक प्रकारात अण्णा भाऊ साठे यांनी लिखाण केले. त्यांचे ७७ पुस्तके प्रकाशित स्वरूपात आज उपलब्ध आहे.अश्या या महान साहित्यिकांचा गौरव म्हणून मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या ३० वर्षापासून १ ऑगष्ट हा  "जागतिक मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा करण्यात येत आहे.याच पद्धतीने हा दिवस सरकारी स्तरावरून साजरा व्हावा. अशे निवेदन जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या संस्कृतिक विभागाला पाठविण्यात आले.

Previous Post Next Post