महाराष्ट्र नवनिर्माण सेने ची झरी तालुक्याची कार्यकारणी जाहीर
झरी | जगदीश खनके ता. प्र. : आज रोजी दिनांक 31/07/2024 आहे रोजी विश्राम गृह झरी येते महाराष्ट्र नवनिर्माण सेना झरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते . राजु उंबरकर यांच्या मार्गर्शनाखाली तालुक्याची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. या बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे तसेच तालुका अध्यक्ष गजानन मिलमिले , काशिनाथ कुमारे , सचिन कोठारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत तालुका उपाध्यक्ष म्हणून प्रफुल देविदास चुक्कलवार, तालुका उपाध्यक्ष म्हणून जगदीश गोर्लावार , तालुका सचिव म्हणून निखिल दशरथवार , उपतालुका सचिव म्हणून कपिल मेश्राम, विभागीय अध्यक्ष ( पाटण सर्कल) म्हणून कृष्णा आईटवार , विभागीय अध्यक्ष ( माथार्जून सर्कल) म्हणून श्रीकांत नुगुरवार , विभागीय अध्यक्ष ( मुकुटबन सर्कल) म्हणून राजेश गज्जलवार , विभागीय उपाध्यक्ष ( पाटण सर्कल) म्हणून . विनोद गिज्जेवार , विभागीय उपाधक्ष्य ( कोसरा सर्कल) अमोल डोहे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
