Top News

एक ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा" महसूल विभाग मार्फत आयोजन - तहसिलदार समाधान सोनवणे

एक ऑगस्ट पासून  महसूल पंधरवडा" महसूल विभाग मार्फत आयोजन - तहसिलदार समाधान सोनवणे 



 तेल्हारा | मनोज भगत ता.प्र. :: दिनांक एक ऑगस्ट २०२४ हा महसूल दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात यावा तसेच महसूल दिनापासून एक ते सात ऑगस्ट या दरम्यान  महसूल पंधरवडा 2024 साजरा करण्यात येत आहे. सदर पंधरवडा मध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे दिनांक 01 ऑगस्ट 2024 "महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ" "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना"  02 ऑगस्ट 2024 "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना"  03 ऑगस्ट 2024  "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" 04 ऑगस्ट2024 "स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय" 05ऑगस्ट 2024  कृषी मार्गदर्शन कार्यक्रम 06ऑगस्ट 2024 "शेती पाऊस आणि दाखले"  07 ऑगस्ट 2024 "युवा संवाद 

08 ऑगस्ट 2024 महसूल जनसंवाद ,9 ऑगस्ट 2024 महसूल इ प्रणाली ,10 ऑगस्ट 2024 सैनिक हो तुमच्यासाठी ,11 ऑगस्ट 2024 आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन ,12 ऑगस्ट 2024 एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या मदतीचा ,13 ऑगस्ट 2024 महसूल अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, 14 ऑगस्ट 2024 महसूल पंधरवडा कार्यशाळा ,15 ऑगस्ट 2024 महसूल संवर्गातील कार्यरत, सेवा निवृत्त अधिकारी,कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवडा सांगता समारंभ अशाप्रकारे कार्यक्रमाचे आयोजन  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास द्विगुणीत व्हावा यासाठी विषय मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 01 ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल पंधरवडा साजरा करण्याबाबत येत आहे. असे तेल्हारा तहसिलदार समाधान सोनवणे यांनी  कळविले आहे.

Previous Post Next Post