Breaking news : धक्कादायक | जिल्ह्यात खळबळ... गडचांदूर येथे बॉम्ब असल्याची माहिती येत आहे समोर.....
बॉम्ब शोध पथक घटना स्थळी दाखल...तपास सुरु.....
चंद्रपूर/गडचांदूर | मनोज श्रीहरी गोरे | उपाजिल्हा प्रतिनिधी | 9921212284 :: गडचांदूर शहरातील गजबजलेल्या भगवती व्यापारी संकुल समोर 3:00 / 3.30 वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली. सदर माहिती वाऱ्या सारखी पसरू लागली.
स्थानकी पोलीसांनी लगेच घटना स्थळ गाठून परिस्थिती अकोट्यात घेत, बॉम्ब शोध पाथकास सूचना दिल्या. सध्या बॉम्ब शोधक पथक गडचांदूर येथे दाखल झाले आहे, बॉम्ब शोधण्याचे कार्य युद्ध पाथळी वर करत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
सध्या त्या वस्तूची तपासणी करण्यात येत आहे, आज बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची गर्दी उसळली आहे. भगवती व्यापारी संकुल समोर एका पिशवीमध्ये ती बॉम्ब सदृश वस्तू आहे.जिल्हाचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास बॉम्ब शोधक पथक करीत आहे. सविस्तर वृत्त लवकरच


