श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
नागभीड ता.प्र. :: नागभीड येथील श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुंविषयी ॠण आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम निमित्ताने छोटेखानी विद्यार्थी सभा घेण्यात आली. विध्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. संवाद सादर केले. अवगत असलेल्या पौराणिक गोष्टी सादर केल्या, विद्यार्थ्यांनी श्लोक गायन केले.या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सर्वांनी सामुदायिक भजन, प्रार्थना सादर केल्या. गुरू शिष्य परंपरा,पुर्वीची व आत्ताची शिक्षण पध्दती,महत्त्व,माहिती सांगुन गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांनी आई वडिल हे पहिले गुरू असतात माहिती सांगितली.आणि गुरू शिष्यांविषयी पौराणिक गोष्ट सांगितली. प्राचार्या शुभांगी पोहेकार यांनी गुरूंविषयीचे अनुभव आठवणी सांगितल्या गुरुजनांचे ॠण विषयी स्वरचित कविता सादरीकरण केली.
सदर कार्यक्रमाची प्रस्थावना विद्यार्थिनी जिया भुरे तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी श्रावणी सावरकर हिने केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गुरू विषयी आदरभाव कृतज्ञता निर्माण झाली.शिक्षणाविषयी जनजागृती तळमळ निर्माण झाली.या कार्यक्रमासाठी,पालक, विद्यार्थी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


