बल्लारशाह शहरातील प्रसिद्ध कापळ व्यावसायिक मालू यांचा दुकानावर गोळीबार....
दुकानातील कामगार जखमी....
बाल्हारशाह :: शहरातील प्रसिद्ध कापळ व्यावसायिकाच्या दुकानावर गोळी बर झाला असून आयात व्यावसायिक थोळक्यात बचावले असून यात त्यांचा दुकानातील नौकराच्या पायाला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे.
चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या वर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आज सकाळी बल्लारशाह वस्ती विभाग परिसरात कापड व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यातून कापड व्यावसायिक सुदैवाने बचावले. दुकानांमध्ये काम करणाऱ्या नोकराच्या पायाला गोळी लागल्याने त्यांचा नोकर जखमी झाला. या घटनेने शहरा सह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेमागचे नेमके कारण काय याचा तपास बल्लारशाह पोलीस करीत आहेत. अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरु केला आहे.
