Top News

Co-family dharna movement of workers in Bamni Proteins Limited.

बामणी प्रोटीन लिमिटेड मधील कामगारांचे सहपरिवार धरणे आंदोलन.


बल्लारशाह : दिनांक 12 जून 2024 रोजी बामणी प्रोटीन्स लिमिटेड येथील कामगारांचे भारतीय केमिकल वर्कर्स युनियनचा नेतृत्वात सहपरिवार धरणे आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी या आंदोलना समर्थन देण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप गिरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पक्षातर्फे आपले समर्थन जाहीर केले, कामगारांच्या या सहपरिवार धरणे आंदोलनात कामगारांच्या परिवारातर्फे उत्स्फूर्त सहभाग दिसून आला तसेच बामणी प्रोटीन व्यवस्थापना विरोधात कामगारांच्या परिवारातर्फे तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला,


भारतीय केमिकल वर्कर्स युनियन तर्फे यावेळी जाहीर करण्यात आले की जर व्यवस्थापन उद्योग सुरू करण्याकरिता सकारात्मक पाऊल उचलणार नाही तर त्याचे गंभीर परिणाम व्यवस्थापनाला भोगावे लागतील, सोबतच आज भारतीय केमिकल वर्कर्स युनियन तर्फे आंदोलनाची तीव्रता हळूहळू वाढवण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. या सहपरिवार धरणे आंदोलनात जवळपास कामगारांचा परिवारातील 300 सहभागी झालेले होते. आणि यापुढेही जर कामगारांना आपल्या परिवारासोबत आंदोलन करण्याची परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा कामगारांचा परिवार आपल्या मुलाबाळां समवेत रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही असे कामगारांच्या परिवारातर्फे सांगण्यात आले.

Previous Post Next Post