स्थानिक कामगारांचे सी. एम.पी. एल. कपानीच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
आंदोलनाचा आज पाचवा दिवस
चंद्रपूर / राजुरा | उपजिल्हा प्रतिनिधी | मनोज श्रीहरी गोरे | :: सी. एम.पी. एल. माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार.स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.
याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले.
बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार,मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम,संकेत भादिकर,शंकर काळे,प्रवीण जेल्लेल,प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.
