Top News

सावळी सदोबा येथील कृषी केंद्र धारकांची मनमानी

सावळी सदोबा येथील कृषी केंद्र धारकांची मनमानी


 कपाशीच्या बियाण्यांची जादा दराने विक्री.....कृषी केंद्र धारकाकडून शेतकरी बांधवांची लूट....संबंधित कृषी विभागाचे दुर्लक्ष...




आर्णी | हिरासिंग राठोड | तालुका प्रतिनिधी :: आगामी खरीप हंगामाच्या पेरणी करण्याकरिता शेतकरी सज्य झाला आहे,शेतीच्या उत्पन्नावर आपल्या संसाराचा गाडा चालवणारा शेतकरी बाजारपेठेमध्ये खते व बियाण्याची खरेदी करण्यासाठी जात आहे,मात्र सावळी सदोबा परिसरातील कृषी केंद्र धारकाकडून बियाण्याची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी ऐकायला येत आहे,अगोदरच शेतकरी अतिवृष्टी,नापिकी व महागाईने त्रस्त झालेला आहे,मागील काळात या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आपली जीवन यात्रा संपवली आहे, दरवर्षी बी-बियाणे व खताचे भाव आकाशाला भिडले आहे, शेती करणे अवघड झाले आहेत,त्यात कृषी केंद्र धारकाकडून बियाण्याची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट होत आहे,संबंधित कृषी विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे,त्यामुळे या परिसरातील कृषी केंद्र धारकाची मनमानी चालू आहेत,आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या दुर्गम व आदिवासी बहुल परिसरात पेरणीच्या हंगामात दरवर्षीच बोगस बियाण्यांची विक्री केल्या जाते,तसेच कापसाच्या बियाण्यांची ज्यादा दराने विक्री होत असते,मागील अनेक दिवसापासून हा प्रकार नित्याचा झालेला आहे,हा परिसर दुर्गम व आदिवासी बहुल असल्याने या परिसरात कोणत्याही संबंधित कृषी विभागाचा अधिकारी फिरत नसल्याने याचा फायदा कृषी केंद्र धारक घेत आहे, कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळेच परिसरातील शेतकऱ्यांची कृषी केंद्र धारकाकडून लूट केल्या जात असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे, अगोदरच शेतकरी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे देशोधडीला लागलेला आहे त्यातच कृषी केंद्र धारकाकडून कपाशीच्या बियाण्यासाठी त्यांची लूट केल्या जात आहे,राशी 659 या कपाशीच्या वाणाला शेतकरी वर्गातून मोठी मागणी आहे,कपाशीची बॅग 864 रुपयांने विकणे बंधनकारक आहे,मात्र या वाणाची कृषी केंद्रामध्ये कमतरता आहे,याचाच फायदा घेत ही बॅग तब्बल एक हजार रुपये ते बाराशे रुपये पर्यंत विक्री केली जात आहे,त्यात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे,एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसताना सुद्धा कृषी विभागाकडून अद्याप या परिसरातील एकही कृषी केंद्र धारकावर कारवाई झालेली नाहीत,कृषी विभागाकडून जणूकाही या परिसरातील शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे,वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून शेतकरी वर्गाकडून होत आहे.

 तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गांना कृषी विभागाचे हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत,शेतकऱ्यांची कुठे फसवणूक होत असेल तर या. 9673451518,94032 00681 हेल्पलाइन नंबर वर तक्रार नोंदवावी,

 दत्तात्रय तम्मडवार

(पंचायत समिती कृषी अधिकारी आर्णी)


शेतकऱ्यांची कृषी केंद्र धारकाकडून फसवणूक होत असताना आढळल्यास सदर कृषी केंद्र धारकाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

आनंद बतकल

( तालुका कृषी अधिकारी आर्णी)

Previous Post Next Post