Top News

सावळी प्राथमिक आरोग्य केंद्राला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची अचानक भेट

 सावळी प्राथमिक आरोग्य केंद्राला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची अचानक भेट


प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची  उडाली तारांबळ...अनेक अधिकारी व कर्मचारी  होते गैरहजर...


गैरहजर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सावळी सदोबा वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पाठराखण




आर्णी |हिरासिंग राठोड |तालुका प्रतिनिधी  ::  आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण व आदिवासी बहुल परिसरामध्ये परिसरातील गोरगरीब नागरिकांना रुग्णसेवा मिळावे याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहेत,मात्र येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याची अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या होत्या, यासंदर्भात परीसरातील अनेक नागरिकाकडून तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी येत होत्या, यासंदर्भात आज अचानक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पवन जाधव यांनी सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता,अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनात आले, गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकारी प्रणव गावंडे यांना विचारले असता त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना उडवा-उडवीचे उत्तरे दिली, यावेळी वैद्यकीय अधिकारी अबोली अहाळे हे सुद्धा गैरहजर असल्याचे निदर्शनात आले,त्यांनी कोणत्याही अधिकृत रजेचा अर्ज नसल्याचे निदर्शनास आले,तर परिचर सागर गावंडे हा नेहमीच गैरहजर राहत असून, गावातील एका मुलाला रोजीने लावून कामे करण्यात येत आहे,या प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सोयी सुविधांचा अभाव असून, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. 

या परिसरातील रुग्णांना वेळेवर रुग्णसेवा मिळत नाही डॉक्टर वेळेवर हजर राहत नाही,त्यामुळे गोरगरीब रुग्णांना ताटकळत वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पाहत बसावी लागत आहे,वेळेवर रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा लागत आहे.

 त्यामुळे या परिसरातील गरीब नागरिकांना आर्थिक उदंड बसत आहे,यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवन जाधव, सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले, यावेळी विस्तार अधिकारी धनंजय इंगोले,दिपक बुटले,नंदकिशोर मात्रे,सुरज नाईक,रविंद्र जाधव उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सतत गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करिता वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. डॉ.पवन जाधव तालुका आरोग्य अधिकारी यावेळी तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून सध्या पावसाळ्याचे दिवस असून,नागरिकांना वेळेवर रुग्णसेवा मिळण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहुन रुग्णसेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Previous Post Next Post