Top News

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली चिमूर आणि नागभीड येथे प्रशासकीय अधिकारी-लोकप्रतिनीधींच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन....

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली चिमूर आणि नागभीड येथे प्रशासकीय अधिकारी-लोकप्रतिनीधींच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन....

● दि. १८ जून/मंगळवार - चिमूर

● दि. १९ जून/बुधवार - नागभीड


नागभीड :: आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्षतेखाली चिमूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामिण भागातील चिमूर आणि नागभीड तालुक्यांतर्गत विविध समस्यांवर, विकासकामांचा आढावा, यापूर्वीच्या झालेल्या विविध प्रशासकीय बैठकांमधील कार्यवाही-कार्यपूर्तता अहवाल, सद्यस्थिती तथा भविष्यकालीन उपाययोजनांसाठी संबंधित विभागांसह अधिकारी-लोकप्रतिनीधींची संयुक्त प्रशासकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. 

या आढावा बैठकीला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी चिमूर व नागभीड तालुक्यातील सर्व सरपंच/उपसरपंच, महसुल तलाठी व मंडळ अधिकारी, जलजिवन मिशन, ग्रामिण/शहरी पाणी पुरवठा विभाग, ग्रामसेवक, कृषी, विद्युत सेवा-सह संस्था अध्यक्ष/सचिव, पोलीस पाटील व सर्व शासकीय कार्यालये यंत्रणा, भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सदर आढावा बैठक ही प्रशासकीय स्थानी पार पडणार आहे. या आढावा बैठकीला सकाळी १० वाजता पासून सुरवात होणार असून दोन्ही बैठकीत विविध समस्या व त्यावरील उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र तसेच, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्र निहाय वेळेचे विभाजन करण्यात आले आहे.


आढावा बैठक चिमूर तालूका समन्वयक - उपविभागीय अधिकारी, चिमूर 

आढावा बैठक नागभीड तालूका समन्वयक - उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपुरी

Previous Post Next Post