Top News

MNS city president Umesh Kundle demanded

मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांची मागणी..‌मान्सूनपूर्व बल्हारशाह शहरातील संपूर्ण नाले स्वच्छता मोहीम राबवा...


 



बल्हारशाह ::  मे महिना चालू असून पावसाळी वृतु अगदी जवळ आला आहे, या आगामी पावसाळी वृतुला पाहता मान्सूनपूर्व  बल्हारशाह शहरातील संपुर्ण नाली सफाई व्हायला हवी जेने करून मान्सून दाखल झाल्यावर नाली चोक होऊन पानी रस्तावर येऊ नये व जनतेला त्रास सहन करावा लागनार नाही या दृष्टी कोनातुन मनसे बल्हारशाह शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांनी मुख्याधीकारी तथा प्रशासक यांच्या अनुपस्थीतीत उपमुख्याधीकारी काटकर यांना निवेदनातुन मागनी केली आहे.

सवीस्तर वृत्त असे आहे की शहरातील काही भाग हा टेकाड तर काही भाग हा उतार भागावर असल्याने अनेक दा पावसाच्या पान्याने नाल्या तुळुंब भरून रस्त्यावर वाहु लागतात ज्याने रहदारीस नागरईकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नालईलईल घान रस्त्याने वाहते इ. बाबि लक्षात घेता   बल्हारशाह महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे निवेदना द्वारे संपूर्ण बल्हारशाह शहरातील नाल्या मान्सूनपूर्व  साफ-सफाई करण्यात याव्या अशी मागणी नगर परीषद  बल्हारशाह चे उपमुख्याधिकारी कातकर यांना महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष विष्णु बुजोने,बल्हारशाह तालुका अध्यक्ष गोपाल मोहुर्ले  यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्हारशाह शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांचा नेतृत्वात निवेदन द्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन देतांना अरुणा तोडसाम शहर अध्यक्ष महिला आघाडी बल्हारशाह, विजेंद्र परमार, कुणाल सहारे, राहुल कामतवार, चेतन मंगाम,बादल मेश्राम,लोकेश कुरेकार,मोहन राजभर, योगराज चौधरी, राजेश कोणपतिवार सह इ.  मनसैनीक  उपस्थित होते.

Previous Post Next Post