कल्याणी गुप्ता जिल्ह्यात प्रथम......
चंद्रपूर :: 13 मे रोजी CASE बोर्डाचा वर्ग 10 वी व 12 वी चा निकाल जाहीर झाला, यामध्ये वर्ग 12 वी ची नारायणा विद्यालयम मधील कल्याणी गुप्ता या विद्यार्थिनीने 94.80 टक्के गुण पटकावीत जिल्ह्यात प्रथम आली आहे. कल्याणी ही चंद्रपुरातील विनोद गुप्ता यांची कन्या आहे, अभ्यासात आई-वडिलांची साथ हे माझ्या यशाचं महत्वाचं कारण होय, व 12 वी च्या परीक्षेत आई-वडील व शिक्षकांद्वारे अभ्यासाचे उत्तम नियोजनात मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया कल्याणी गुप्ता ने दिली आहे, पुढे शिक्षण पूर्ण केल्यावर मला सीए व्हायचं असं माझं स्वप्न आहे. अशी इच्छा कल्याणी ने व्यक्त केली.
