Top News

त्या अपघात ग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका देवदुत....

त्या अपघात ग्रस्तांसाठी ठरले भाजपा तालुका देवदुत.... 

 



  कोरपना (ग्रा.प्र) नितेश केराम :: कोरपना तालुक्यातील कोठोडा फाट्याजवळ एका दुचाकी चालकाचा अपघात आज 26 एप्रिल दुपारी 2:00 वाजता दरम्यान झाला.  ते रत्याचा कळेला पडले जखमी अवस्थेत  त्यांना पाहुन सुद्धा ये जा करणार्यांनी त्यांना मदत केली नाही.

भाजपाचे तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर यांचे वाहन याच रस्त्याने येत असतांना त्यांनी अपघात ग्रस्त रस्त्याच्या कडेला दिसतात त्यांनी त्या दोघांनाही आपल्या स्वताच्या चारचाकी वाहना मध्ये टाकून दवाखान्यात पोचविले त्यांच्या या मदतीने त्या दोन्ही अपघातग्रस्थ सुखरुप आहे.

 मात्र हें तलंगणा राज्यातील नागरिक असावे असा अंदाज दर्शवीला जात आहेत वृत्त लिहीपर्यंत त्या अपघात ग्रस्त नागरिकांनची ओळख पटली नव्हती भाजपा तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर हें त्या अपघात ग्रस्तसाठी देवदूत ठरले त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.



Previous Post Next Post